#

Advertisement

Friday, September 11, 2026, September 11, 2026 WIB
Last Updated 2026-09-11T14:53:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तुकाराम मुंढे MPSC चे अध्यक्ष होऊ शकतात !

Advertisement

रोहित पवारांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : एमपीएससी पेपर फुटीच्या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. MPSC पेपरफुटी प्रकरणात माझ्याविरुद्ध पुरावे दाखवा, मी पायउतार होईल असे भीमनवार यांनी म्हटले होते. त्यानंतर, रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आज महापरिवहन विभागात त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात झालेल्या तक्रारी, घोटाळ्याची आणि गैरव्यवहाराची माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्र्‍यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि अन्यथा ते मुख्यमंत्र्‍यांचे मित्र आहेत, म्हणूनच त्यांचा राजीनामा होत नाही, असा संदेश समाजात जाईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले. दरम्यान, रोहित पवार यांनी MPSC च्या अध्यक्षपदी तुकराम मुंढे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आज पुण्यातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यावरुन, भाजपकडून कोणीतरी आलं होतं तुमच्याशी बोलायला, त्यांची फजिती झाली, असे म्हणत रोहित पवार यांनी विक्रम पाचपुतेंवर टीका केली. तसेच, चाणक्यांचा फोटो दाखवत अमित शहा यांच्यावर देखील रोहित पवार यांच्याकडून टीका करण्यात आली. बरेच लोक चाणक्य असल्याचं सांगतात, त्यांचं तरी ऐका असं म्हणत टोला लगावला. आम्ही लढत राहणार आहोत तुम्ही पाठिंबा द्या, तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढू, कारण हा विषय महत्वाचा आहे. या माणसाचा राजीनामा व्हायला पाहिजे, सत्ताधारी आमदारांनी यावं मी चर्चा करायला तयार आहे, असे म्हणत विक्रम पाचपुते यांना रोहित पवारांनी आंदोलनाला यावं अस आमंत्रण दिले.