#

Advertisement

Wednesday, September 16, 2026, September 16, 2026 WIB
Last Updated 2026-09-16T13:28:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ग्रामपंचायत कार्यालयातून मोदींचा फोटो हटवला

Advertisement

ग्रामपंचायत कार्यालयातून मोदींचा फोटो हटवला

बुलढाणा : मनसेचे युवा नेते युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील  एका महाविद्यालयात जाऊन तेथील प्राचार्यांच्या कार्यालयात असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजुला हा फोटो बसवल्याचा आक्षेप घेत अमित ठाकरेंसह मनसैनिकांनी हा फोटो हटवला. त्यावरुनच चांगलाच राजकीय वाद पाहायला मिळाला. भाजप आणि मनसेच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियासह रस्त्यावरही फुल्ल ड्रामा दिसून आला. आता, बुलढाणा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयातूनही अशाच पद्धतीने एका युवकाने मोदींचा फोटो हटवल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील   खामगाव तालुक्यातील संभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लावलेला फोटो विठ्ठल हिंगणे या तरुणाने काढून ग्रामपंचायतीसमोरच फोडला. त्यानंतर, ग्रामपंचायत अधिकारी यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल हिंगणे याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या 324(3)BNS सह कलम 3 सार्वजनिक संपत्तीस हानी पोहोचवणे या कलमानुसार आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, युवकाच्या या आंदोलनाची गावस्तरावर चांगलीच चर्चा रंगली होती.