#

Advertisement

Tuesday, September 29, 2026, September 29, 2026 WIB
Last Updated 2026-09-29T17:18:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरचा पालकमंत्री बदला : मोहिते पाटील

Advertisement

राम सातपुते म्हणाले, ते 'तुमच्या बस की बात नाही' 

सोलापूर : जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याला चांगला पालकमंत्री देण्याची मागणी केली होती. सोलापूरला शेतीची जाण असलेला, जिल्ह्याला वेळ देणारा आणि जनतेचे म्हणणे समजून घेणारा पालकमंत्री मिळावा, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या टीकेला भाजपचे नेते आणिमाजी आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पालकमंत्री बदलणं तुमच्या बस की बात नाही, असा टोला सातपुतेंना मोहिते पाटलांना लगावला आहे.  

पालकमंत्री बलदणे तुमच्या बस की बात नही है असं म्हणत राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. एकहाती या जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्यांचा, सामान्यांचास गोरगरीबांची काळजी जयाभाऊ घेत आहेत त्यांच्या मागे सगळा जिल्हा असल्याचे सातपुते म्हणाले. शेतकऱ्याचा, शेतमुजाचा मुलगा राज्याचा ग्रामविकास मंत्री होतो, जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्यांना मळमळ होणं स्वभाविक आहेत असे सातपुते म्हणाले. जिल्ह्याचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे काय? असा सवाल सातपुतेंनी मोहिते पाटलांना केला. देवाभाऊंचा विश्वास शिलेदार म्हणून जयकुमार गोरे काम करत असल्याचे सातपुते म्हणाले. या जिल्ह्याला कामाचा पालकमंत्री भेटला असल्याचे सातपुते म्हणाले. जयाभाऊंच्या तिथे आरती करायला नारायण पाटील, अभिजीत पाटील होते, सिद्धाराम म्हेत्रे, शहाजीबापू पाटील होते असेही ते म्हणाले. मलाही तिथे बोलावले होते असे सातपुते म्हणाले. 

तुम्ही सगळ्या संस्था मोडीत काढल्या, अशी टीका करत त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठीशी संपूर्ण सोलापूर जिल्हा असल्याचा दावा केला. मोहिते पाटील विरुद्ध गोरे हा संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. पालकमंत्री बदलण्याची मागणी करणाऱ्या मोहिते पाटलांना सातपुतेंनी थेट प्रत्युत्तर दिल्याने आगामी काळात राजकीय वातावरण आणकी गरम होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राम सातपुते यांनी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर देखील टीका केली. गेल्या काही दिवसांत जानकर यांची भाजपशी आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सातपुतेंनी त्यांच्यावर टीका केली. कोणी जर एखादा उगाच येऊन गळ्यात पडत असेल, तर कोणी गळ्यात घेत नसतं असा टोला सातपुतेंनी जानकरांना लगावला आहे.