Advertisement
मुंबई : सोमवारी (ता. २८) आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 51 हजार 470 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 38 हजार 848 रुपये आहे. चांदीचा दर सध्या 2 लाख 35 हजार 70 रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. गेल्या महिन्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 3.5 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात सुमारे 32 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आजच्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15 हजार 147 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्यासाठी 15 लाख 14 हजार 700 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13 हजार 885 रुपये असून, 100 ग्रॅमसाठी 13 लाख 88 हजार 475 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11 हजार 360 रुपये असून, 10 ग्रॅमसाठी 1 लाख 13 हजार 603 रुपये आहे. प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 51 हजार 200 रुपये, दिल्लीत 1 लाख 50 हजार 940 रुपये, चेन्नईत 1 लाख 51 हजार 640 रुपये, हैदराबादमध्ये 1 लाख 51 हजार 440 रुपये, कोलकात्यात 1 लाख 51 हजार रुपये आणि बेंगळुरूमध्ये 1 लाख 51 हजार 320 रुपये आहे.
दरम्यान, या आठवड्यात सोन्या-चांदीच्या बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी, पश्चिम आशियातील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींचा मौल्यवान धातूंच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील ग्राहक विश्वास, जीडीपी, महागाई, रोजगार आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांची वक्तव्ये याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बाजार बंद राहणार असल्याने हा आठवडा कमी दिवसांचा आहे.
