#

Advertisement

Monday, September 28, 2026, September 28, 2026 WIB
Last Updated 2026-09-28T17:22:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवारांचे मोठे वक्तव्य....

Advertisement

‘सिल्वर ओक’ निवासस्थानी बैठकीचा केला खुलासा 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासह एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी बैठक झाल्याच्या बातम्यांनंतर या चर्चांना आणखी उधाण आले होते. मात्र, आता शरद पवार यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे. पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आपण कुठेही जाणार नाही. ज्यांना आमच्यासोबत यायचे असेल त्यांनी यावे. आम्ही मात्र आमची भूमिका बदलणार नाही आणि कुठेही जाणार नाही.” गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यातच दोन्ही गटांचे एकत्रीकरण आणि एनडीएमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेचीही चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वक्तव्याकडे महत्त्वाचे मानले जात आहे. पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पक्षाच्या भूमिकेबरोबरच राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या निर्णयांवरही भाष्य केले. प्रदेशाध्यक्षांनी पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचे बैठकीत सांगितले. त्यानंतर पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्ष कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत आणि एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.