#

Advertisement

Wednesday, September 16, 2026, September 16, 2026 WIB
Last Updated 2026-09-16T17:33:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिक्षण संस्थाचालकाने आत्महत्येपूर्वी बहिणीला केलेला फोन

Advertisement

 

लातूर : प्रसिद्ध चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे संस्थापक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 67) यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.आत्महत्येपूर्वी त्यांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
लातूर पॅटर्न’मुळे शैक्षणिक जगतात शहराचे विशेष नाव आहे. अशा परिस्थितीत एका नामांकित शिक्षण संस्थाचालकाने अचानक आयुष्य संपवल्यामुळे सर्वत्र आश्चर्य आणि दुःखाचे वातावरण आहे. सोनवणे यांनी वैयक्तिक तणाव, आजारपण की इतर कोणत्या कारणाने हे कृत्य केले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
लातूर येथील पद्मानगर भागात असलेल्या राहत्या घरी संजीव सोनवणे हे 14 ते 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री एकटेच होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी मुंबईत राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन केला होता आणि त्यांना तातडीने लातूरला येण्यास सांगितले होते. फोन आल्यानंतर त्यांची बहीण लगेचच लातूरसाठी रवाना झाली. मात्र, ती घरी पोहोचण्याआधीच सोनवणे यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तूलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत “माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये आणि या प्रकरणाचा तपास करू नये,” अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे. सोनवणे यांचे कुटुंब परदेशात राहत असल्याने ते घरी एकटेच राहत होते. तसेच ते काही आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे एकाकीपणा किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.