#

Advertisement

Friday, October 23, 2026, October 23, 2026 WIB
Last Updated 2026-10-23T11:17:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भजनातील भक्तीरस दुःखातून विठ्ठलाच्या चरणाची जोडतो : ॲड.कोमल ढोबळे-साळुंखे

Advertisement

 

मंगळवेढा : भजन म्हणजे केवळ गाणे नाही तर त्या आत्म्याने ईश्वराला घातलेली आर्त हाक असते. भजनात जो भक्तीरस आहे तो माणसाला संसाराच्या दुःखातून मुक्त करून थेट विठ्ठलाच्या चरणाशी जोडतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा तथा सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी केले.

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून सावली फाउंडेशनच्यावतीने रेणुका महिला भजनी मंडळास सदिच्छा भेट देउन सर्व महिला सदस्यांना लेडीज पर्स भेट देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षा ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे महिला सदस्यांना संबोधून म्हणाल्या की, तुम्ही सर्व महिला प्रपंचातून वेळ काढून भजन सेवेत रममाण झालात ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. सर्व महिलांचे कौतुक करत रेणुका भजनी मंडळास जे सहकार्य लागेल ते करण्यास मी तयार असल्याचेही ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी सांगितले.

याप्रसंगी रेणुका महिला भजनी मंडळाच्याअध्यक्षा यल्लुताई सलगरे, शुभदा उघाडे, रजनी होनमाने, रंजना होनमाने, सुवर्णा पंडित,मीना इंगळे, वर्षा शिवशरण, लता भोरकडे,पल्लवी उघाडे, शोभा वाकळे-जाधव, वंदना कलुबर्मे, प्रतिभा पाटील, प्रमिला बाबर, संगीता मोरे, डॉ.तनुजा होनमाने, सविता कोळेकर, सुरेखा पाटील, नीलम पारेकर, सारिका पाटील, भाग्यश्री सलगरे, शोभा स्वामी, मीना वाघमोडे,  सुनंदा सोमदळे या महिला सदस्य उपस्थित होत्या. ही सहकार्याची भावना व्यक्त केल्याबद्दल रेणुका महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा रेणुकाताई सलगरे यांनी ॲड.कोमल ढोबळे-साळुंखे यांचे आभार व्यक्त केले.