#

Advertisement

Monday, October 12, 2026, October 12, 2026 WIB
Last Updated 2026-10-12T16:54:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवार भावुक, जय, पार्थ स्मृतीस्थळावर

Advertisement

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. कारखान्याचे आधारस्तंभ, कणखर नेतृत्व असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी पहिली निवडणूक, अजितदादांच्याविषयी सहानुभूती, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फौज, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे शेवटच्या क्षणी बंड, युगेंद्र पवार यांची तिसरी आघाडी, आदी घडामोडींतून शिवारातील लढत रंगतदार झाली. या तिरंगी लढतीत ऊस उत्पादक सभासदांचा विजयी कौल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भविष्यात व्यापक बनविण्यासाठी निणार्यक ठरला.
बारामती तालुक्यातील सोमेश्‍वरनगर येथील सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ सहकारातील सत्ताबदलाचा प्रसंग नाही; तर अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची झालेली पहिली मोठी सहकार क्षेत्रातील कसोटी होती. अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय पोकळी, सुनेत्रा पवार यांच्यावर आलेली नेतृत्वाची जबाबदारी, पक्षातील अंतर्गत आव्हाने होती. सोमेश्वरच्या सत्तेसाठी उभे ठाकलेले तीन पॅनल, असे चित्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी निर्माण झाले. एकाच वेळी दोन पॅनल आखाड्यात उतरल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी पहिलीच अग्निपरीक्षा होती. ऐन निवडणुकीत विश्‍वासू शिलेदार असलेले अध्यक्ष जगताप यांनी वेगळी चूल मांडली. अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली. जगताप यांनी भाजपशी घरोबा करीत स्वतंत्र पॅनल तयार केले. त्यात आजी- माजी संचालकांना समावेश होता. ज्यांना पद देऊन मोठे केले. त्यांनीच लढाईत फंदफितुरी केल्याची भावना ऊस उत्पादक सभासदांमध्ये निर्माण झाली होती.  

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलच्या विजयी उमेदवारांची यादी. गटनिहाय विजयी उमेदवार : गट क्रमांक १ : निंबूत–खंडाळा : १) अभिजीत सतीश काकडे, २) प्रमोद भगवानराव काकडे, ३) डॉ. वसंतराव रामराव दगडे. गट क्रमांक २ : मुरूम–वल्हा : १) विक्रम आनंदराव भोसले, २) ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड, ३) राजवर्धन शिवाजीराव शिंदे. गट क्रमांक ३ : होळ–मोरगाव :१) रवींद्र जयवंतराव भापकर, २) मकरंद चंद्रकांत सस्ते व ३) मनीषा आनंदकुमार होळकर.

गट क्रमांक ४ : कोराळे–सुपा : १) राजेंद्र बोरकर, २) अक्षय खलाटे व ३) सुनील भगत. गट क्रमांक ५ : मांडकी–जवळार्जुन : १) सतीश जगताप, २) सुधाकर टेकवडे व ३) उत्तम धुमाळ.

राखीव प्रवर्गांतील विजयी उमेदवार : महिला प्रतिनिधी : (अ वर्ग) १) प्रणिता मनोज खोमणे, २) छबुबाई अंकुश नाझीरकर. भटक्या जमाती व विमुक्त जाती प्रवर्ग : १)अशोक चंद्रकांत धायगुडे व २) शैलेश पंढरीनाथ रासकर. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : १) द्वारकोजी गुलाब साळवे.

ब वर्ग प्रतिनिधी : १) संग्राम तानाजी सोरटे.