#

Advertisement

Tuesday, October 27, 2026, October 27, 2026 WIB
Last Updated 2026-10-27T16:36:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल ! काँग्रेसला धक्का

Advertisement

मविआच्या हर्षदा जाधव आणि महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर

भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर

पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर  आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान आमदार जयंत आसगावर हे थेट चौथ्या क्रमांकावर पिछाडीवर पडले आहेत. याशिवाय पदवीधरमध्ये प्राथमिक कलानुसार मविआच्या हर्षदा जाधव आणि महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे. .पदवीधर चा विजयी मतांचा कोटा अजून निश्चित होणं बाकी आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासात 51 हजार 511 मते वैध ठरली आहेत. त्यामुळे विजयासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा ठरला आहे. पहिल्या कलांनुसार शिक्षक मतदारसंघातुन भाजपचे कौस्तुभ गावडे हे आघाडीवर आहेत तर एकनाथ शिंदे शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अपक्ष आमदार दत्तात्रय सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळं आता विजयासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा कोणता उमेदवार पार करणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे शिक्षक मतमोजणीत 1 हजार 675 मतं बाद झाली आहेत. तर 51 हजार 511 मतं वैध ठरली आहेत. त्यामुळं जिंकून येणाऱ्या उमेदवाराला किमान 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित केला आहे. परिणामी निवडूण येण्यासाठी दुसऱ्या क्रमांकांचीही मतं ग्राह्य मोजावी लागणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, भाजपचे कौस्तुभ गावडे हे पहिल्या क्रमांकावर तर सेनेचे प्रा. सचिन सानप हे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.