#

Advertisement

Wednesday, October 28, 2026, October 28, 2026 WIB
Last Updated 2026-10-28T11:49:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरातून हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयी लीड देण्यात यशस्वी!

Advertisement

 


ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले अभिनंदन ; शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबविली

सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाबद्दल पक्षाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांचे अभिनंदन केले. तसेच सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रचार यंत्रणेला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख-जाधव यांना सोलापूर जिल्ह्यातून विजयी आघाडी मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो, ही समाधानाची बाब आहे, अशी भावना ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात प्रचाराचे नियोजन करण्यात आले होते. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीत भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देत प्रचाराची जोरदार तयारी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठीही प्रयत्न करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, सामाजिक कार्य आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी या मुद्द्यांवर हर्षदा देशमुख-जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. निकालानंतर सोलापुरातील आंबेडकर चौकात समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांचे अभिनंदन करत सोलापूर जिल्ह्यातील प्रचारात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले. जिल्ह्यातून विजयी आघाडी मिळवून देण्याच्या प्रयत्नांना मिळालेले यश पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी नमूद केले.