#

Advertisement

Friday, October 23, 2026, October 23, 2026 WIB
Last Updated 2026-10-23T17:10:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्वाची अपडेट

Advertisement

 


सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्तीयांना धडाधड नोटिसा

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या दोन खास सहकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे दोन्ही अधिकारी सध्या उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील सुमारे 40 एकर सरकारी जमिनीच्या व्यवहारात संशयास्पद भूमिका असल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. हे संपूर्ण प्रकरण पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीभोवती फिरत आहे. ही जमीन गैरव्यवहाराची घटना उघडकीस आली, तेव्हा हे दोन्ही अधिकारी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक (PA) म्हणून काम पाहत होते. तपास यंत्रणांच्या संशयानुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर मध्यस्थी करत या प्रकरणातील महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पार्थ पवार यांना मदत केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी आधीच केला होता. सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती काही महत्त्वाचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि पुरावे लागले आहेत. या चॅटिंगमध्ये हे अधिकारी आणि प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींमधील झालेला संवाद स्पष्ट झाला आहे. याच डिजिटल पुराव्यांच्या आधारे आता या दोघांची सखोल चौकशी केली जाणार आहे. पवार कुटुंबाच्या वैयक्तिक आणि राजकीय कामकाजात सक्रिय असलेल्या या अधिकाऱ्यांना मिळालेल्या नोटिसांनंतर ते काय उत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.