Advertisement
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे
पुणे : राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघासाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवरजोरदार टीका केली आहे. भाजप हा अॅनाकोंडा आहे. भाजप मित्र पक्षाला गिळतो हे आम्ही सांगत होतो. हे आता दिसायला लागलं आहे. भाजपने राष्ट्रवादीची जागा घेतल्याचे शिंदे म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने स्मिता जाधव यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ही जागा गेली आहे. bगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरही शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपला प्रत्येक संस्था ताब्यात घ्यायच्या आहेत. गोकुळबाबत देखील हेच होणार असल्याचे शिंदे म्हणाले. भाजपच्या लोकांना पुणे एमपीएससी आंदोलन बदनाम करायचं आहे, कारण लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा रोष वाढत आहे. त्यातूनच त्यांनी वेगळं आंदोलन उभं देखील केलं आहे अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.
सरकारला देखील कोर्टाने सूचना केल्या आहेत. माझी कोर्टाला विनंती आहे की जे काही चुकीचं घडत आहे, त्यावर देखील कारवाईचे निर्देश द्यावेत. सध्या भाजप प्रवक्ते या आंदोलनाबाबत राजकारण करत असल्याचे शशिकांत शिंदे म्हणाले. एमपीएसीच्या आंदोलनाबाबत रोहित पवार राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, तुम्ही देखील आंदोलनात फूट पाडण्यासाठी दुसरं आंदोलन उभा केलं आहे. तुमचे नेते येऊन त्या ठिकाणी भाषण करत होते, याकडे दुर्लक्ष करत येणार नाही असे शशिकांत शिंदे म्हणाले.
