#

Advertisement

Friday, October 2, 2026, October 02, 2026 WIB
Last Updated 2026-10-02T17:27:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा

Advertisement

 

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक तर पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं आता उमेदवारी कोणाला मिळणार याबाबतच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. 

कोणत्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार?

1. औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)- माजी आमदार

2. पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवारांची राष्ट्रवादी / मविआ)- - माजी आमदार

3. नागपूर पदवीधर: अभिजीत गोविंदराव वंजारी (काँग्रेस)- माजी आमदार

4. अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना - शिंदे गट)- माजी आमदार

5 पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)- माजी आमदार