#

Advertisement

Friday, October 2, 2026, October 02, 2026 WIB
Last Updated 2026-10-02T17:13:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, ८ थेट सवाल

Advertisement

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार हे सध्या बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. मात्र, या दौऱ्याच्या वेळेवर आणि हेतूवर प्रश्न उपस्थित करत बारामतीतील भाजप नेते दिलीप खैरे यांनी शरद पवार यांना एक खुले पत्र लिहून जोरदार हल्लाबोल केला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा केवळ राजकीय फायद्यासाठी आणि नातवाच्या राजकीय पायाभरणीसाठी आखण्यात आल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.


दिलीप खैरे यांनी पत्रात खालील प्रमुख प्रश्न उपस्थित केले आहेत :

  • सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतरही बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? संपला असेल तर आजही शेतकरी पाण्याच्या आशेने का बसला आहे?
  • जर पाण्याचा प्रश्न सुटला असेल, तर उन्हाळा आला की दरवर्षी तलाव, बंधारे आणि शेतीसाठी पाण्याची मागणी का करावी लागते?
  • बारामतीला विकासाचे मॉडेल मानताना झालेले काम स्व. अजितदादांचे आहे हे आपण मान्य कराल का?
  • जनता सोडून आता कुटुंबातील नातवांमध्ये जे राजकारण सुरू आहे, ती कूटनीती पाहून आम्ही थक्क आहोत. जेष्ठ नेत्याने सर्वसमावेशक राजकारण करायला नको का?
  • सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या काळातच लाडक्या नातवाला आणि उमेदवारांना सोबत घेऊन हा दौरा आखणे म्हणजे 'ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखे' नाही का?
  • एवढी वर्षे सत्ता हातात असताना बारामतीच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्नासाठी दीर्घकालीन योजना का राबवली नाही?
  • आज आजही दुष्काळी भागातील शेतकरी कालव्याला आणि विहिरीला पाणी राहील का, याचीच वाट का पाहत आहे?
  • बारामतीचा इतर विकास झाला म्हणतात, मग 'पाण्याचा विकास' अजून बाकी का राहिला?