#

Advertisement

Monday, November 16, 2026, November 16, 2026 WIB
Last Updated 2026-11-16T11:37:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार !

Advertisement

अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून या प्रकरणाच्या तपासाची मागणी सातत्याने केली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर थेट भाष्य केले आहे. अजितदादांच्या विमान अपघातात जो कोणी दोषी आढळेल, त्याला फासावर लटकवले जाईल, असे ठाम विधान मुख्यमंत्र्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस बोलत होते.
अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले. ते म्हणाले, दादा पहाटे सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करायचे. त्यानंतर मी काम करायचो आणि एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करायचे. अजितदादांची कामाची जी शिस्त होती, ती राजकारणात फार क्वचितच पाहायला मिळते. वरून अतिशय कणखर वाटणारे दादा आतून तितकेच प्रेमळ होते. आम्हाला दादांच्या रूपाने एक भक्कम आधार होता. आज राज्यात जी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, त्या काळात त्यांची प्रकर्षाने आठवण येते.  पुणे जिल्हा आणि अजित पवार यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, पुणे जिल्ह्याबद्दल दादांच्या मनात एक वेगळीच आत्मीयता होती. पुण्याच्या प्रगतीचा आलेख लिहिताना अजितदादांच्या कार्याचे सुवर्णपान लिहिल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही.