#

Advertisement

Friday, November 27, 2026, November 27, 2026 WIB
Last Updated 2026-11-27T14:31:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर जिल्हा बँकेचा निकाल चर्चेत !

Advertisement

भाजपने 18 जागा जिंकल्या, मोहिते पाटील गटाला एकच जागा

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित पॅनेलने मोठे यश मिळवले आहे. संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी 18 जागांवर या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे, मोहिते पाटील गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत बँकिंग गटात पाहायला मिळाली.  भाजपप्रणित पॅनेलमधून बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, विक्रांत (बाळराजे) पाटील, सिद्धेश्वर आवताडे, यशराज शिंदे, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, शंभूराजे जगताप, सचिन कल्याणशेट्टी आणि अजिंक्यराणा पाटील यांचा समावेश आहे. निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या अन्य उमेदवारांमध्ये बाबासाहेब देशमुख, अर्चना घाडगे, शामल बागल, राजेंद्र बंदीछोडे, रणजितसिंह शिंदे, मनीष देशमुख, सूर्यादित्य साळुंखे आणि महादेव कांबळे यांचा समावेश आहे. मोहिते पाटील पॅनेलकडून माळशिरस सोसायटी गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले. या निकालामुळे भाजपप्रणित पॅनेलचे बँकेतील वर्चस्व स्पष्ट झाले आहे.