#

Advertisement

Thursday, June 16, 2022, June 16, 2022 WIB
Last Updated 2022-06-16T13:01:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

देहू संस्थानचे अध्यक्ष भडकले... विलास लांडे यांनी काढली समजूत

Advertisement

 पिंपरी : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात जाणून बुजून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपमान करण्यात आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यांना भाषण करण्याची संधी दिली गेली नाही, या वरुन चांगलेच वातावरण तापले आहे. याच मुद्दयावर आज एका पत्रकार परिषदेत देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांना विचारणा केली असता ते चांगलेच भडकले. एवढेच नाही तर मीडिया वर खापर फोडण्याचा प्रयत्न करत ते मधुनच उठून जाऊ लागले. मात्र पत्रकार परिषदेत उपस्थित असणारे माजी आमदार विलास लांडे यांनी समजूत काढल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बसले.

पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी देहू संस्थानला 22 लाख रुपयांचे चांदीचे सिंहासन आणि पूजा साहित्य दिले जाणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आमदार बनसोडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नितीन महाराज मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यास संधी दिली नाही. यावरून विचरणा करण्यात आली. त्यावेळी ते चांगलेच भडकले. ऐवढेच नाही तर पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला.