#

Advertisement

Thursday, June 16, 2022, June 16, 2022 WIB
Last Updated 2022-06-16T11:59:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

"ओअसिस 'मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

Advertisement

 


भोसरी : शाहु शिक्षण संस्थेच्या इंद्रायणीनगर येथील ओअसिस इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
ओअसिस शाळेत प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षय संस्थेच्या विश्‍वस्त, संचालीका कोमल साळुंखे-ढोबळे, संचालक अजय साळुंखे, प्राचार्या प्राजक्‍ता जोशी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत त्यांचे स्वागत केले. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विविध कौशल्य, गाणी, गोष्टी यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या सर्व उपक्रमांत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभागी घेत फार दिवसांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या सोबतीने शाळेचा पहिला दिवस साजरा केला. प्राचार्या जोशी यांनी विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षाच्या शाळेबाबतची माहिती दिली. या वेळी शिक्षिका सरोज वाघमारे, केतकी खोल्लम, हर्षदा पाटोळे, कृष्णाली, स्वप्ना चिंचकर यांच्यासह शिक्षकेतर सेवक वर्ग उपस्थित होता.