#

Advertisement

Monday, July 18, 2022, July 18, 2022 WIB
Last Updated 2022-07-18T10:51:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिंदे गटाच्या बैठकीला 14 खासदार हजर

Advertisement

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे 14 खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेचे 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर आहे. एकूण18 खासदारांपैकी 14 खासदार हे शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीच शिवसेनेला संपवण्याचा दिल्लीत कट रचला आहे. शिवसेनेच्या खासदारांनावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईचा दबाव टाकला जात आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.