Advertisement
सातारा : थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरातील पाँईंटला देण्यात आलेली इंग्रजांची नावे ही तातडीने बदलावी आणि या सर्व पाँईंटला क्रांतीकारकांची नावे द्यावीत, अशी मागणी सध्या भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीमार्फत करण्यात आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली आहेत. या विषयावरून आता येथील थंड हवामान तापण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वरातील पाँईंटची नावे :
ऑर्थरसिट, विल्सन पाँईंट, लॉडविक पाँईंट, लेस्ली विल्सन पाँईंट, केटस् पाँईंट, एलिफन्ट हेड, निडल होल पाँईंट, बेबींन्टन पाँईंट, इको पाँईंट, बाँम्बे पाँईंट, लिंग मळा वॉटर फाँल पाँईंट, किंग चेअर पाँईंट, विंडो पाँईंट, इको पाँईंट हन्टिंग पाईंट, टायगर स्प्रिंग पाँईंट, कॅसल रॉक पाँईंट, मंकी पाईंट पाँईंट, मरजोरी पाँईंट, कॅटस पाईंट पाँईंट, मिडल पाँईंट, सनसेट पाँईंट, प्लॅटो पाँईंट, वेण्णालेक पाँईंट, पारसी पाँईंट.
