#

Advertisement

Wednesday, July 27, 2022, July 27, 2022 WIB
Last Updated 2022-07-27T11:53:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भाजपचा माझ्यावर दबाव नाही !

Advertisement

सांगली :  भाजपकडून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतून नेते फोडण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात. ते यापूर्वी झाले होते, आताही तेच सुरू आहे, अशी टीका राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. मात्र, माझ्यावर असा कोणताही दबाव नासल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले.

डॉ. कदम म्हणाले, गांधी घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी, विकासासाठी योगदान, बलिदान दिले. या कुटुंबाला राजकीय द्वेषातून नाहक त्रास दिला जात आहे. जाणिवपूर्वक अवमान, अनादर केला जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचे शुकल्काष्ठ हेतूपुरस्सर लावले जात आहे. हे लोकशाहीला गालबोट आहे.
ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत, आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला, इंपिरकल डेटा देखील याच सरकारने दिला, त्या आधारावरच ओबीसींना आरक्षण मिळाले आहे, नुकतेच सत्तेत आलेले शिंदे- भाजप सरकार याचे श्रेय घेऊ शकत नाही, लोक सगळे जाणतात असेही ते म्हणाले.