#

Advertisement

Tuesday, July 19, 2022, July 19, 2022 WIB
Last Updated 2022-07-19T11:37:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पवारांनी 2009 मध्ये केलेला डाव मी मोडला !

Advertisement

पुणे : शिवसेना-राष्ट्रवादीची युती शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी 2009 सालीच होणार होती. त्यासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला. मात्र, पुढे हा डाव 2019 ला केला गेला, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलयांनी लांडेवाडी येथील पत्रकार परिषदेत केला आहे. 
शिवनेरी निवासस्थान येथे कार्यकर्ता मेळावा झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आपल्यावर शिवसेनेने अन्याय केला असून मनाला खूप वेदना झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, की 18 वर्ष प्रामाणिक राहून माझी आधी हकालपट्टी केली आणि मग सारवासारव केली, हे पटलं नाही. मनाने शिवसेनेसोबत असून सोबत मात्र एकनाथ शिंदेच्या आहे, शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं आहे.