#

Advertisement

Tuesday, July 19, 2022, July 19, 2022 WIB
Last Updated 2022-07-19T11:41:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रशहर

सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण

Advertisement

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. 19 जुलै रोजी सकाळी 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्यांची किंमत 50493 रुपये होती. तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत 55204 रुपये आहे. IBJA वेबसाईटनुसार, 23 कॅरेट 10 ग्रॅम सोने 50291 रुपयांना, 22 कॅरेट शुद्धतेचे सोने 46252 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय 18 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 37870 रुपये आहे. 14 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 29538 रुपयांना विकले जात आहे. तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीची किंमत 55204 रुपयांवर गेली आहे.
24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं आज 174 रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर 22 कॅरेट सोने 179 रुपयांनी घसरले आहे. 21 कॅरेट सोने 167 रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर 18 कॅरेट सोने 152 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज 14 कॅरेट सोन्याचा भाव मागील दिवसाच्या तुलनेत 112 रुपयांनी कमी झाला आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 410 रुपयांनी कमी झाली आहे.

कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोन्याला सर्वात शुद्ध सोने म्हटले जाते. त्यात इतर धातूंची कोणत्याही प्रकारची भेसळ नसतो. त्याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते. 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने आहे. इतर 8.33 टक्के इतर धातूंचा समावेश आहे. 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोने आहे. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.