Team Lakshvedhi
Last Updated
2022-07-27T12:05:17Z
उजनीत तब्बल १५ टीएमसी गाळ
Advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी, नाशिक जिल्ह्यातील गिरणा, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी आणि नगर जिल्ह्यातील मुळा या पाच धरणांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक येथील मेरीचे महासंचालक रा. रा. शहा यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती तयार करण्यात आली असून, नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. सं. म. बेलसरे, जलविद्युत (स्थापत्य) गुणनियंत्रणचे मुख्य अभियंता सं. रा. तिरमनवार, पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता सं. द. चोपडे हे सदस्य असणार आहेत. तर, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) राज्यासह देशभरातील विविध धरणांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. उजनी धरणात जमा होणाऱ्या गाळाचा अभ्यास करताना या धरणात १४.९७ टीएमसी गाळ आला आहे. तसेच या धरणात दरवर्षी ०.४३ टीएमसी गाळ जमा होत असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.