Advertisement
नांदेड : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी प्राध्यपकांनी आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. पण, आता थेट त्यांनी हात धरून शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू अशी धमकी दिली, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेत ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या संदर्भात अद्याप अशोक चव्हाण यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
