Advertisement
धुळे येथे प्रदेश अध्यक्ष रमेश
गालफाडे यांनी व्यक्त केला विश्वास
बहुजन रयत परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र
युवक अध्यक्ष पदी सागर कांबळे यांची नियुक्ती
माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय बहुजन रयत परिषद पदाधिकारी पदग्रहण सोहळा गुरुवारी (दि.21) प्रदेश अध्यक्ष रमेश (तात्या) गालफाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश महिला अध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे या उपस्थित होत्या.
यावेळी बहुजन रयत परिषेदेच्या उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी पै. सागरभाऊ कांबळे यांची तर धुळे जिल्हा अध्यक्ष पदी तुषार ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी यांची कार्यकारिणीही यावेळी जाहीर करण्यात आली.
प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे पुढे म्हणले की, बहुजन समाजाने एक जुट होऊन वंचित, गोरगरीब समाजाचे जे-जे प्रश्न असतील ते सोडविण्याची जबाबदारी नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांची आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब गेल्या 40 वर्षांपासून समाज जागृतीचे काम करीत आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपणही काम केले पाहिजे.
महिला प्रदेश अध्यक्षा कोमल साळुंखे यांनी सांगितले की, कार्यकर्ता हा संघटनेचा कणा आहे. संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा वाघ आहे. संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन वंचित, उपेक्षित जमाजाचे काम उत्तर महाराष्ट्राची टीम जोरात करीत आहे. उपेक्षित समाजाच्या मुलांनी शिक्षण घेणे काळाची गरज आहे. शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम या पुढील काळात बहुजन रयत परिषद करणार आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून सामाजिक काम केल्यास संघटना वाढीस वेळ लागणार नाही.
यावेळी राज्य पदाधिकारी बबनराव गायकवाड, साहेबराव शृंगार, सूर्यकांत भालेराव, ना. म. साठे, रवींद्र पाटील, अंबादास अहिरे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला राज्य सचिव ईश्वर क्षीरसागर, राज्य कार्यकारी सदस्य साहेबराव शृंगार, राज्य उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, ना.म.साठे, अनिल बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष नानासाहेब खंडाळे, नाशिक शहर अध्यक्ष अंबादास अहिरे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गणेश साठे, ज्येष्ठ सल्लागार ओंकार बाबा सपकाळे, देवाबाबा वारूनगसे, पुण्यावरून आलेले बबन गायकवाड, दत्ता पाटील, विशाल खंदारे यांच्यासह नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उत्तरमहाष्ट्र अध्यक्ष रवींद्र वाकळे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडूनाना गांगुर्डे यांनी केले होते. सूत्र संचालन रवींद्र वाकळे यांनी केले तर ईश्वर क्षीरसागर यांनी आभार मानले.

