Advertisement
जळगाव : 'राजकारणामध्ये चिठ्ठी देण्याचे प्रकार हे चालत राहतात. कधी ते लेटर तर कधी प्रेमाची चिठ्ठी असते तर कधी सूचना असतात. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची एकनिष्ठ संधी त्यांच्या पक्षाने दिली आहे. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा मुख्यमंत्र्यांना व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना चिठ्ठीद्वारे सूचना केली असेल, असं म्हणत राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसंच शिंदे गट हा मनसेमध्ये सामील होण्याची शक्यताही खडसेंनी नाकारली नाही. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना एकनाथराव खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीवर देखील एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं.
