#

Advertisement

Saturday, July 16, 2022, July 16, 2022 WIB
Last Updated 2022-07-16T18:24:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कोल्हापुरातही शिवसेना फुटली?

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापुरातल्या कुस्तीच्या आखाड्याची नेहमी चर्चा असते. पण आता कोल्हापुरात राजकीय आखाडा चांगलाच रंगताना दिसतोय. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा कोल्हापूर दौरा हा शिवसेनेत वादळ घेवून येणारा ठरताना दिसतोय. कारण विनायक राऊत यांनी शुक्रवारी कोल्हापुरातल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात जी फटकेबाजी केली होती त्या फटकेबाजीचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्या फटकेबाजीतून त्यांनी कोल्हापुरातील इतर नेत्यांवर केलेली टीका ही शिवसेनेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीकेनंतर आता कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  विनायक राऊतांनी शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली होती. क्षीरसागर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रेमाने जेवायला बोलावले आणि त्याचे पैसे काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्याकडून घेतले, असा दावा केला होता. विनायक राऊतांची ही टीका क्षीरसागर यांच्या प्रचंड जिव्हारी लागली आणि त्यांनी राऊतांना थेट आव्हानच दिले. कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात येतील, असा इशारा राऊतांना दिला.