Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्याची वीज पुरवठा खंडीत झाल्याने यातून राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर अवघ्या काही मिनीटांत २०० मिटर लांबून तात्पूरत्या स्वरूपाची त्यांच्या घरासाठी वीज पूरवठा करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांचा बंगला मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असल्याने वीज पुरवठा कसा खंडित झाला यावर वेगळे अर्थ काढले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या बेस्ट बसची केबल जळाल्याने बंगल्याची बत्ती झाली होती. दरम्यान बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. हे काम ज्या ठिकाणी सुरू त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांचा बंगला आहे. यामुळे त्यांच्या बंगल्यासमोरच 5 फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून 3 लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने अनेक चर्चांना ऊधाण आले आहे.
