Advertisement
पनवेल : भाजप कार्यकारणीची बैठकत पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत. यावेळी राज्यातील सत्तातराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, की अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले पुढे ते म्हणाले, की सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपण मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. मुंबई महानगर पालिका आपण जिंकायची, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
