Advertisement
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अनमोल होते आणि ते प्रतिभावंत ताकदीचे लेखक होते. जाती- जातीचे देखावे आपण कधी नष्ट करणार आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे हा संदेश अण्णाभाऊ साठे यांनी दिला असून तो अंमलात आला पाहिजे. मी मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री झालो पण कधी जमीन सोडून उपयोग नाही. आपण जमिनीवर आणि लहान राहिले पाहिजे असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन कार्यक्रमात 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाजवादी भारताचे स्वप्न साकार होईल का' या परिसंवादात ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रत्नालाल सोनाग्र, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, कामगार सुरक्षा दल अध्यक्ष भगवान वैराट, सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिरबन सरकार, माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, गुरमित कौर मान, ससून रुग्णालय अधिष्ठता डॉ विनायक काळे, किशोरभाई ठक्कर, डॉ संजोग कदम उपस्थित होते.
