Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे म्हणजे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार कोसळून आता राज्यात नव्याने शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. राज्यात सत्तांतर होऊन एक महिना होत आहे. तरी सुद्धा अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय, यावरुन आता विरोधक आक्रमक होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करत आहेत. तर दुसरीकडे हे सरकार जास्त काळ टिकणार नाहीय असं सुद्धा बोललं जात आहे, त्यामुळं मध्यावधी निवडणुका कधीही केव्हाही लागू शकतात, असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जर निवडणुका लागल्या तर केव्हाही आम्ही निवडणुकांना सामोरी जाण्यास तयार आहोत असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार म्हणाले की, लोकांना कौल देण्याची संधी मिळेल तेव्हा ही राजकीय परिस्थिती बदलेल. सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत परिस्थिती चिंताजनक आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात दौरे करावेत असा सल्ला सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला व मध्यावधी निवडणुका लागल्यास आम्ही तयार आहोत.
