#

Advertisement

Saturday, July 30, 2022, July 30, 2022 WIB
Last Updated 2022-07-30T11:03:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

समाजातील युवकांनो लक्षात घ्या, शिक्षणाशिवाय प्रगती नाही

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचे प्रतिपादन

काटी : शिक्षणाशिवाय प्रगती नाही, समाजातील युवकांनी हे लक्षात घ्या, पदवीधर शिक्षण घेऊन पुढे यावे, शासकीय योजना असताना केवळ त्याची माहिती नसल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही, अशा योजनांसाठीचा साधा अर्ज करायला आपला तरूण जात नाही, यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे, आपल्याला आता थांबायचे नाही मागचं सगळं विसरून पुढे जायचे आहे, समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी कायमच कटिबद्ध असल्याची ग्वाही महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कोमल साळुंखे यांनी उपस्थित नागरिकांना दिली.
तुळजापूर तालुक्‍यातील काटी येथे शुक्रवारी (दि.29) सकाळी 11:00 वाजता येथील अण्णा भाऊ साठे नगरमध्ये बहुजन रयत परिषदेच्या शाखेचे उद्‌घाटन बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे व महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, आपण शिकलो नाही पण मुलांना शिकवा, शिक्षणाबाबत त्यांना काही कमी पडू देऊ नका, ढोबळे साहेबांनी आपल्यासाठी शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाळासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बहुजन रयत परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय महापुरे यांच्या हस्ते ऍड. कोमल साळुंके-ढोबळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे कार्याध्यक्ष संजय महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम. ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय महापुरे, विकास क्षिरसागर, देवा महापुरे, विष्णू कांबळे, भाऊ क्षिरसागर, दिलीप डोलारे, जितेंद्र चव्हाण, साजन क्षिरसागर, प्रविण क्षिरसागर, श्रावण वाघमारे आदींसह बहुजन रयत परिषदेचे महिला कार्यकर्त्या तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.