Advertisement
इस्लामपूर : वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न राहिल्याने काढलेले वारंट रद्द करण्यासाठी इस्लामपूर कोर्टात माजी मंत्री जयंत पाटील यांनी हजेरी लावली. शिगाव (ता.वाळवा) येथे जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात जयंत पाटील यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर हे वारंट होते. शुक्रवारी दुपारी जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.
