Advertisement
मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण, 27 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाच्या विस्ताराला कोणताच मुहूर्त अजून मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे एकटेच दिल्ली आज रात्री जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन 27 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. शिंदे आणि भाजपच्या गोटात मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहे. एकाच महिन्यात शिंदे यांचीही चौथी दिल्लीवारी आहे.
