#

Advertisement

Wednesday, July 27, 2022, July 27, 2022 WIB
Last Updated 2022-07-27T11:24:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरेंना शहाजी बापू पाटलांचा सवाल

Advertisement

सांगोला : काय झाडी, काय डोंगार... असा डायलॉग म्हणून लोकप्रिय झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाष्य केलं आहे. 'महाराष्ट्रातील व्यक्तीनं गुवाहाटीचे कौतुक केलं तर त्यात वाईट वाटायचं काय? असा सवालच बापू पाटील यांनी केला आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महा मुलाखतीतून सांगोल्याचे शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गुवाहाटीच्या कौतुकावरुन टीका केली होती. आता शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक पाहता या राज्यातील जे ज्येष्ठ नेते आहे, त्यापैकी उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य करु नये, असा सल्लाच शहाजीबापू पाटलांनी दिला आहे.