Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर भेट घेतली. अन्नदा डामरे असं या चिमुकलीचं नाव असून ती शनिवारी एकनाथ शिंदे यांना भेटली. माझ्या मोठ्या बाबांनी मला टीव्हीवर दाखवलं, की कोरोना काळात आणि पूरपरिस्थिती तुम्ही लोकांची खूप मदत केली. मी मोठं होऊन लोकांची मदत केली तर मला मुख्यमंत्री बनता येईल का, असा निरागस प्रश्न तिने मुख्यमंत्र्यांना विचारला. या चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना म्हटलं की मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेवून जाल का? असं तिने मुख्यमंत्र्यांना विचारलं. यावर सगळेच हसू लागले. मुख्यमंत्र्यांनीही गुवाहाटीला तुला देवीच्या मंदिरात जायचं आहे ना? असा सवाल करत ही चिमुकली खूप हुशार असल्याचं म्हटलं. पुढे ही चिमुकली मुख्यमंत्र्यांना म्हणते, 'एक सांगू का? आधी मला फक्त मोदीजी आवडायचे.पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडता. यानंतर उपस्थित सगळे हसू लागतात. पुढे ती मुख्यमंत्र्यांना आणखी काही प्रश्न विचारते. मात्र, तिच्या शेवटच्या प्रश्नावर तिथे एकच हशा पिकतो.
