Advertisement
मुंबई : सोन्याच्या दरात मागील आठवड्याच्या घसरणीनंतर आज तेजी दिसून आली. चांदीच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळाली आगे. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही किंचित वाढ झाली आहे. 24 कॅरेटचे शुद्ध सोने आणि 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 50 हजारांच्या पुढे आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत 15 जुलैपासून सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50629 रुपये प्रति तोळे इतका आहे. तर शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 50403 रुपये प्रति तोळेच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 226 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे.
चांदीचे दर
आज चांदीचा दर 55574 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 54767 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 807 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.
