Advertisement
इंदूर : इंदूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 'हा पूल जुना आहे. बस ही वेगाने जात होती. ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलाचा कठडा तोडून बस नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली. बसमध्ये 15 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमचे प्रमुख बाळासाहेब खिस्ते यांनी माहिती दिली.
चंद्रकांत पाटील चालक होते, तर चौधरी हे वाहक होते. एकूण 40 प्रवाशी होते. सकाळी 10.30 वाजता आम्हाला एक फोन आला होता. आमचं राज्य कंट्रोल युनिट आहे. मध्यप्रदेशमध्ये काय घटना होते. याची माहिती आम्हाला मिळत असते. घटनेची माहिती मिळताच आपातकालीन टीमला माहिती देण्यात आली. त्यानंतर इंदूर, खरगुणची टीम आणि धारची टीम घटनास्थळी रवाना झाली. आतापर्यंत 15 जणांना मृत्यू झाला आहे. 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवाशी होते, अशी माहिती खिस्ते यांनी दिली.
'ज्या ठिकाणी हा अपघात घडला आहे तिथे मुसळधार पाऊस सुरू आहे. पुलावर एक कार बसच्या मागे होती. कारचालकाने माहिती दिली की, बसही ओव्हरटेक करत होती. पण अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळली. बसचा वेग हा जास्त होता. बसचे चारही चाकं वर होती. त्यामुळे बस जेव्हा नदीत कोसळली त्यावेळी बसच्या काचा फोडून प्रवाशी बाहेर आले असावे, जे मृतदेह सापडले आहे ते बसमध्येच होते. नदीची खोली किती आहे, याचा माहिती घेतली जात आहे.
या बसमध्ये लहान मुलं होती, महिला होत्या. बस जेव्हा नदीपात्रात कोसळली तेव्हा पाणी ही फुफ्फसापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे मुलांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाची अवस्था ही पाहण्यासारखी नव्हती, असंही बाळासाहेब खिस्ते यांनी सांगितलं.
