Advertisement
मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेनं खासदारांच्या दबावापुढे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. पण, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी 'मातोश्री'वर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आता चार दिवस उरले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेमध्ये खासदारांच्या गटाने मोठा दबाव निर्माण केला होता. खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल झाल्या असून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार अशी चर्चा सुरू होती, पण आता चर्चांना विराम मिळाला आहे.