#

Advertisement

Thursday, July 14, 2022, July 14, 2022 WIB
Last Updated 2022-07-14T10:39:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सरपंच निवडीचा निर्णय बदलला!

Advertisement



मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. आता राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ही ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणारस असल्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.