#

Advertisement

Monday, July 18, 2022, July 18, 2022 WIB
Last Updated 2022-07-18T11:32:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पिंपरी चिंचवड शहरात १ हजार १९ जणांचे नळजोड नियमितसाठी अर्ज

Advertisement

पिंपरी : चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत. यामध्ये ब प्रभागातून सर्वाधिक 260, ह मधून 238 तर सर्वात कमी इ प्रभागात 56 अर्ज आले आहेत. 
शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोद आहे. मात्र, त्या तुलनेत अधिकृत नळजोड धारकांची संख्या कमी आहे. शहरात अवैध नळजोड धारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केल्याने पाण्याची गळती होते. तसेच, दूषित पाणीपुरवठाही होतो. याचा परिणाम विस्कळीत पाणीपुरवठ्यावर होतो. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी अवैध नळजोडाचे सर्वेक्षण केले आहे. अवैध नळजोड नियमिती करण्यासाठी सवलती जाहीर केल्या. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाचे उत्पन्नही अतिशय कमी आहे. त्यामुळे महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात येणार होते. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखण्यात आले होते.