#

Advertisement

Friday, July 15, 2022, July 15, 2022 WIB
Last Updated 2022-07-15T17:17:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

बटनावर बोट जाग्यावर पलटी!

Advertisement

- प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री, भाजपा प्रांतिक सदस्य, सोलापूर


श्री संत दामाजी पंत! झेंडा कुणाचा घेऊ हाती, असे "धर्मसंकट' उभे राहिल्यावर म्हणालो होतो. अखेर मत मोजणीच्या आधी पाच दिवस शेकडो ऊस उत्पादक आणि दलित कार्यकर्त्यांनी "करेक्‍ट' कार्यक्रम करणार, असे सांगितले होते. अर्थात दामाजी कारखान्याची निवडणूक त्यांनी हाती घेतली होती. कारण, सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर 19 हजार सभासद कमी करणे, ऊस घातला नाही, असे कारण दाखवित 4000 सभासदांचा मतदानाचा हक्क नाकारणे या सर्वच गोष्टी अतिशय गुरर्मीत आणि बेकायदेशिरपणे झाल्या होत्या. तर, सोलापुरचा सहआयुक्‍त जराड असो अगर राज्याचा सहकार मंत्री असो दोघेही कायद्यात "निरक्षर' असल्यामुळे कायद्यापुढे सर्व समान आहेत याचे भान त्यांना नव्हते. त्यामुळे सतत सभासदांच्या रागाचा पारा वाढतच गेला आणि याचे रूपांतर चेअरमनसह 2700 मतांच्या पराभवात झाले. एकुण प्रतिकुल वातावरणात ताजे पोते याचा सरावच झाला होता. रोज पगाराशिवाय काम करणारे कामगार साखरेच्या डोहात मिरचीच्या ठेच्याबरोबर भाकरी खात होते आणि माय बहिणीच्या शिव्या शापाचे चेअरमन धनी ठरले होते. अखेर, व्यक्‍तीगत चेअरमनचाही दारूण पराभव झाला, याबद्दल अवघा तालुका "समाधान' व्यक्‍त करीत आहे.

"पावसात भिजल्यावर' लोकं मतदान करतात....
समाधान दादांनी लोकांचा दांडगा संपर्क वाढवला. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत आमदार साहेब हजारो लोकांना भेटून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत. "पावसात भिजल्यावर' लोकं मतदान करतात या विश्वासाने नाट्यमय प्रचार केला. आमदार परिवाराने कष्टाचा पैसा ऐन वेळी बाहेर काढला आणि मताला 3 ते 5 हजार रुपयाचे वाटप केले तरी मंगुड्याच्या लोकांनी दाद दिली नाही. 500 लिडचा दणका दिला. तरी मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, दिल्ली या ठिकाणच्या वरिष्ठांचे संबंध सांभाळुन पणजीकरांना विश्वासात घेऊन प्रचाराचे तंत्र समजाऊन सांगितले म्हणून मतदार संघाकडे थोडे दुर्लक्ष झाल्यास आपण सगळ्यांनी आमदारांना समजून घेतले पाहिजे. तालुक्‍याच्या विकासकामाला साथ दिली पाहिजे. जे श्रेष्ठचे आदेश माणुन आमदारांना भविष्यात मदत केली पाहिजे.

समाधान दादांनी शब्द खाली पडू दिला नाही....
समाधान दादा कुशल संघटक असून भिंतीशी टकरा घेऊन आपली ताकद वाया घालू नये. प्रसंगी डिस्टलरी, कॉजन आणि इथेनॉल या प्रकल्पाची समाधान दादांनी जबदरस्त अभ्यास केला असून त्यांच्या मार्गदर्शनाचा समविचारी आघाडीने मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि आमदारांशी आदराने वागून विकास कामाशी हमखास तडजोड केली पाहिजे. तरच कारखाना योग्यरित्या चालवता येईल. साखर तातडीने विकून कारखाना कर्जाचे व्याज भरण्याचा प्रयत्न समाधान दादांनी केला आहे. गेल्या दिड वर्षात दिलेला शब्द दादांनी कधीच खाली पडू दिला नाही. त्यामुळे अजूनही दामाजी कर्जमुक्तीला आमदार साहेब आतभार लावतील, अशी अपेक्षा करूया.

चार चेअरमनांनी हे सिद्ध केलं....
दामाजी कारखाना निवडून येणे फारच सोपे होते. वसाड गावाची पाटीलकी जिंकणे सहज सोपी होती. परंतु, दामाजी कारखाना चालवणे मात्र हजार पटीने अवघड आहे. सर्वगुण संपन्न व्यक्‍तिमत्त्वाचे दामाजी चालवणे, कसे शक्‍य आहे, हे चार चेअरमनांने सिद्ध केले आहे. साखरेच्या वाटा आणि पळवाटा जीएसटीचा दांडगा अभ्यास यामुळे साखर धंद्यातला चकवा जाणून काही नेते मंडळी अतिशय उत्तम पध्दतीने तत्काळ साखर जिल्ह्याच्या बाहेर न्यावी लागते हे फार थोड्याजणांना धाडसीपणाने जमते. यामुळे समविचारी आघाडीच्या संचालकासह आपण सर्वजण समाधान दादांना नेता मानून पुढे जाणे अधिक फायदेशीर, अधिक सुलभ होईल, असे वाटते.

....त्यामुळेच खटक्‍यावर बोट
शिंदे, आवताडे उभय आमदारांनी जगाचा प्रवास करून साखर धंद्याची बाजारपेठ समजून घेतली आहे. अभिजीत पाटील आणि शिवानंद पाटील उभयतांनी केलेली जादू अनुकरणीय असून पांडुरंगाला मळलेल्या वाटेला जाण्यापेक्षा 86032च्या ऊसाचा वाण नाकारून 434 चा ऊसाचा वाण ऊस उत्पादक सभासदांना समजावून सांगितला आहे. यामुळेच वारसदारांचे सभासदांनी काहीच चालू दिले नाही. त्यामुळे ऊसाचा नवा वाण पाहून ऊस उत्पादक सभासदांना मतदान केले आहे. त्यामुळेच खटक्‍यावर बोट जाग्यावर पलटी झाले आहे. अखेर मताला 3000ची दानत असलेले नेते पराभूत झाले आणि 2000च्या दानतीचे नेते विजयी झाले हा मोठा चमत्कार असून निट वागा, नम्रता राखा, सालगडी म्हणून मालकाशी उरलेल्या वेळेत नीट वर्तन करा, अशी पहिली नोटीस मतदार राजाने सालगडी लोक प्रतिनिधीला पाठवली आहे. दादासाहेब अतिशय समंजस नेतृत्व असून कष्टाळू इमेजचे नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा समाधान दादा यशस्वी होतील, अशी दामाजीच्या पायाजवळ प्रार्थना करूया. चोखोबाच्या पायावर डोकं टेकवतो आणि थांबतो.