Advertisement
सोलापूर : जिल्हा परिषदेने स्वच्छतेच्या आषाढी वारी परंपरेला छेद दिला आहे. सोलापूर जि.प. सीईओंसह २० हजार अधिकारी कर्मचारी स्वच्छतेपासूून गायब असल्याची चर्चा जोर धरली आहे. पंढरी वारी संपल्या नंतर जि.प. सीईओंसह अधिकारी स्वःत हाती झाडू घेऊन स्वच्छता करत असतात. यंदा मात्र फक्त दिखाऊपणा झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. पारंपारिक अधिकाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेला छेद दिल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे. आषाढीवारी दरम्यान निर्मलवारी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. तो यंदाही चांगल्या पद्धतीने राबविला गेला. याचे मान्यवरांनी कौतुक केले. पण वारी पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे मार्गावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाते. यावेळेस अशा स्वच्छता मोहिमेचे नियोजन झालेच नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. वारीनंतर स्वच्छता उपक्रम राबवायची याची जबाबदारी कोण घेणार हे जिल्हा परिषद प्रमुखांना सांगण्यात आलेच नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी हे वारीदरम्यान आजारी पडले. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत आणि प्रशासन गाफीलच राहिल्याचे दिसून येत आहे.
