#

Advertisement

Wednesday, July 20, 2022, July 20, 2022 WIB
Last Updated 2022-07-20T17:44:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पावसात भिजून कार्यकर्त्यांशी संवाद...

Advertisement


मुंबई :
 शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू आहे. आज वडाळ्यामध्ये त्यांची निष्ठा यात्रा सुरू होती, तेव्हा अचानक पाऊस आला. भर पावसामध्येही आदित्य ठाकरेंनी पावसात भिजून कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी छत्री घ्यायला नकार दिला. आदित्य ठाकरेंचं भाषण ऐकायला पावसातही गर्दी होती. 
आदित्य ठाकरेंच्या या भाषणामुळे पुन्हा एकदा शरद पवारांच्या  साताऱ्याच्या पावसातल्या भाषणाची आठवण झाली. 2019 विधानसभा आणि साताऱ्याच्या पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी पावसात भिजून सभा घेतली. या सभेमुळे निवडणुकीचं चित्र बदलल्याचं बोललं जातं. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती. राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत होते. उदयनराजे भोसले यांनीही लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिंकल्यानंतर काही महिन्यांमध्येच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे साताऱ्याची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला.