Advertisement
बीड : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे अपघाती प्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे. मेटे यांच्या सहकऱ्यांनी 3 ऑगस्टला मुंबई पुणे एक्स्प्रेसवर एका कारने पाठलाग केल्याचा आरोप केला आहे. अखेरीस ज्या गाडीने मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता, त्या गाडीचा फोटो समोर आला आहे.
विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झालं. पण 3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खुलासा मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या या आरोपानंतर ज्या इर्टिगा गाडीने पाठलाग केला होता. त्या गाडीची ओळख पटली आहे. MH -TD-8239 असा या गाडीचा नंबर आहे. 3 ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांचा पाठलाग करणारी हीच गाडी होती असा दावा अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे.
