#

Advertisement

Tuesday, August 16, 2022, August 16, 2022 WIB
Last Updated 2022-08-16T11:38:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?

Advertisement

मुंबई  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील काही आमदारांची आणि हिंसक वर्तवणुकीचं समर्थन करतात का? असा सवाल अजित पवारांनी केली. तसेच सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय काय? असे सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार केले आहे.
हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले आहेत, असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरश: महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशाप्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. शिवसैनिकांचे हात तोडा, तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथडा काढा. अरे काय ही पद्धत? कुठे शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र, कुठे आपले पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करताना कशा पद्धतीने राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीने झाले पाहिजेत, असं शिकवलं त्याच यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रामध्ये तोडा-फोडा-मारा ही पद्धत वापरली जातेय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय का? भाजपला पटतंय?", असे प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केले.