Advertisement
मुंबई : पंकजा मुंडे भाजपमधल्या मोठ्या नेत्या आहेत. पंकजा यांना पक्षाने मध्य प्रदेशचं सहप्रभारी केलं आहे, पण इच्छा असूनही त्यांना मध्य प्रदेशच्या आपल्या आवडत्या डीएसपीला मनाप्रमाणे पोस्टिंग देता येत नाहीये. पंकजा मुंडेंनी दिलेलं शिफारसीचं पत्र गृहविभागाच्या फाईलींमध्ये धूळ खात पडलं आहे. पंकजा मुंडे यांनी मागच्या वर्षी 29 ऑक्टोबरला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना पत्र लिहिलं. शाजापूरच्या डीएसपींना मंदसौर जिल्ह्याच्या गरोठ किंवा नीमच जिल्ह्याच्या जावदमध्ये एसडीओपी म्हणून नियुक्त करावं, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी शिवराज सिंग चौहान यांच्याकडे या पत्रातून केली. पंकजा मुंडे यांनी दिलेल्या शिफारस पत्राची फाईल मार्च महिन्यापर्यंत अधिकाऱ्यांच्या टेबलांवर फिरत होती, पण मार्च महिन्यानंतर अचानक ही फाईल धूळ खात पडली आहे.
