Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांचा घरांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. आपल्या हक्काची घरे व्हावेत यासाठी मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळीत राहणारे पोलीस अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. ठाकरे सरकारने पोलिसांना 25 लाखात घरे देण्याचा निर्णय घेतला होता. पण नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने पोलिसांना त्यांच्या हक्काची घरं 15 लाखात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. "बीडीडी चाळीतील पोलिसांची 2200 घरं मालकी तत्त्वार देण्याचा विषय आहे. पण त्यांची किंमत देणं पोलिसांना परवडणारं नाही. त्यांची किंमत ५० लाख इतकी होती. त्यानंतर आपण २५ लाख केली होती. या घरांची किंमत कमी करुन प्रत्येक घराची किंमत 15 लाख केल्याचा निर्णय आपण घेत आहोत", अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
