Advertisement
पुणे : जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 व्या जयंती निमित्ताने आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी काँग्रेचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भर सभेतच चिमटे काढले. यामुळे चांगलीच जुगलबंदी रंगलेली बघायला मिळाली.
"आत्ताचे सरकार राज्यपालांचे ऐकणारे सरकार आहे", असं सांगत आमदार दिलीप मोहिते यांनी राज्यपालांना लक्ष केलं. तर "आमदारच हा कामदार असतो आणि राज्यपाल नामधारी असतो", असं उपहासात्मक प्रत्युत्तर भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं. या जुगलबंदीने उपस्थितांत चांगलीच हशा पिकली. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनीही उडी घेत काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या गुरुबद्दल केलेल्य वादग्रस्त विधानाला छेडले आणि छत्रपतींचे गुरु हे त्यांचे आई-वडील होते, अस ठणकावून सांगितल.
दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास नवी पिढी शिकत नसल्याची खंतहीराज्यपालांनी व्यक्त केली. सध्या फक्त पैसा आणि सत्ता यासाठी सर्व राजकारणी आणि जनता काम करत असल्याचं दिसत आहे. यामुळेच काही राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्री जेलमध्ये गेले असल्याचंही राज्यपालांनी सांगितले.
